Pune News : ‘कोविशिल्ड’ ही लस जानेवारीपासून उपलब्ध होऊ शकते – अदर पूनावाला

एमपीसी न्यूज – ‘कोविशिल्ड’ लसीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते, असे पुणेस्थीत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना हि माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

ब्रिटनमध्येही ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत. यूकेने त्यांचा डाटा शेअर केला आणि लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आपण पुढच्या दोन ते तीन आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे, असे अदर पूनावाला म्हणाले.

मॉर्डना, पीफायझर आणि अस्त्राझेनेकाची लस अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सफर्डच्या लसीबद्दल सध्या तरी कुठलीही चिंता नाही. कोविशिल्ड ही दोन डोसची लस आहे. लशीच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल असे पूनावाला यांनी सांगितले. लसीचे दर अजून निश्चित झाले नसले तरी सानोफी-जीएसके आणि मॉर्डनापेक्षा सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीचे दर परवडणारे असतील, असे पूनावाला म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.