Pune News : कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी स्पॉट तयार करा ; राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची मागणी

एमपीसी न्यूज – मोकाट कुत्र्यांना अनेक प्राणीप्रिय नागरिक खाण्यास देतात, याचा त्रास काही नागरिकांना हाेताे. त्यामुळे शहरांत माेकाट कुत्र्यांना खाण्यास देण्यासाठी काही ‘स्पाॅट’ निश्चित करुन, त्याच ठिकाणी खाद्य देण्याचे बंधन घालण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत सेलच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आराेग्य विभागाचे प्रमुख डाॅ.आशिष भारती यांना आज मागण्यांचे निवेदन दिले. खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अर्बन सेलचे नितीन कदम, मनाली पवार, नितीश रे यांनी डाॅ. भारती यांच्याशी चर्चा केली.

_MPC_DIR_MPU_II

खा. चव्हाण म्हणाल्या, माेकाट कुत्री आणि पाळीव जनावरांचा उपद्रव कमी करणे आणि प्राणी प्रेमींच्याही भावना दुखावणार नाही यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्बन सेल आता यापुढे काम करणार आहे.

तर नितीन कदम म्हणाले, पाळीव जनावरांच्या संदर्भात केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीचे पालन केले पाहीजे. त्याचवेळी या जनावरांचा इतर नागरिकांना उपद्रव हाेणार नाही यासाठी उपाय याेजना केली पाहीजे. तसेच कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी आवश्यक त्या नियमांचे पालन केले जावे, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.