Pune News : कोविड काळात आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या 50 पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोविड काळात शासनाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पुण्याच्या अलका चौकात आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी आमदार आणि पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक अशा पन्नास जणांविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविका सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात पुणे शहर भाजपच्या वतीने रविवारी सकाळी अलका चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती.. तरीसुद्धा या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, सुशील मेंगडे, संदीप खेडेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, प्रमोद कोंढरे, संदीप खर्डे, तुषार रायकर, वर्षा तापकीर, अर्चना पाटील यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.