Pune News : खासदार काेल्हे यांच्या भावाविराेधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचे बाबत फेसबुकवर अपशब्द वापरुन वादग्रस्त पाेस्ट टाकल्या प्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे शिरुरचे खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांचा भाऊ सागर रामसिंग काेल्हे विराेधात मंचर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे.

नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली आहे. त्याचे श्रेयावादारुन आजी-माजी खासदार एकमेकांचे विराेधात वक्तव्ये करत आहेत. याबाबत खासदार काेल्हे यांचे भाऊ सागर काेल्हे यांनी फेसबुक पेजवर माजी खासदार आढळराव पाटील यांचेबाबत अपशब्द वापरुन वादग्रस्त पाेस्ट प्रसिद्ध केली. त्यामुळे यासंर्दभात दत्ता गांजाळे यांनी मंचर पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सागर काेल्हे यांनी त्यांचे आक्षेपार्ह वक्तव्या बद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा गांजळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.