Pune News : गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

0

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली आहे. कोथरूड भागात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा व काडतुस जप्त करण्यात आले.

अथर्व उर्फ एबी सुनिल बहिरट (वय 20, रा. शिवाजीनगर गावठाण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिरट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. पौड रस्त्यावर बहिरट थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा ( पिस्तुल) असल्याची माहिती पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण अडागळे यांनी सापळा लावून त्याला पकडले. बहिरट याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुस जप्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.