Pune crime News : सेवानिवृत्त फौजदारावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकवणाऱ्या गुन्हेगारांना अटक

0

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त फौजदारावर कोयत्याने वार करुन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन फरार झालेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल, एक दुचाकी व कोयता असे 70 हजार 450 रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे.

आरोपी अश्पाक मोहंमद शेख ( वय 29, रा. अशोकनगर, येरवडा, पुणे) व सुशिल मुकुंद निकम ( वय 26, रा. गणेश नगर, येरवडा, पुणे ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघीनींही गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त फौजदार प्रकाश जयकुमार बुरले ( वय 58, रा. स्वारगेट पोलीस लाईन, पुणे) 25 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रस्त्यावरून चालत जात होते.

त्यावेळी पाठीमागून ॲक्टीव्हा दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन नेला होता. त्याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या गुन्हयातील संशयीत आरोपींचा तांत्रीक बाबीच्या आधारे शोध घेत असतांना पोलीस कर्मचारी समीर माळवदकर व बंटी कांबळे यांना ॲक्टीव्हा दुचाकीवर पाठीमागे बसलेला संशयीत इसम हा येरवडा पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार अश्पाक शेख असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तर कदम याला येरवडा परिसरात जेरबंद करण्यात आले.

चौकशीअंती त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल, एक दुचाकी व कोयता असे 70 हजार 450 रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे करत आहेत.

आरोपी अश्पाक मोहंमद शेख येरवडा पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याचेवर यापुर्वी सन 2016 साली जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.