Pune News : सराईत गुन्हेगार ‘चुहा’ येरवडा कारागृहात स्थानबध्द

 एमपीसी न्यूज – तौसिफ उर्फ चुहा हा सराईत गुन्हेगार आहे. याच्या नावावर खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे, जातीय दंगली, दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ नुसार कारवाई करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या तौसिफ उर्फ चुहा जमीर सय्यद याला पकडून येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ उर्फ चुहा जमीर सय्यद हा भारती विद्यापीठ परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळच्या एका पडीक बंगल्यात लपुन बसला असल्याची खबर भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी सर्फराज देशमुख, राहुल तांबे यांना मिळाली. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर यांना दिली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्यास ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करुन त्यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे ‌

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like