Pune News : मंत्रालयाच्या आवारात लोकसेवकांच्या वाहनांचा डामडौल, जनतेच्या वाहनांना मात्र ‘नो एन्ट्री’!

एमपीसी न्यूज – जनतेचे सेवक असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या (Pune News) वाहनांसाठी मुंबईतील मंत्रालयासह बहुतांश शासकीय कार्यालयांच्या आवारात डामडौल असताना जनतेच्या वाहनांना मात्र ‘नो एन्ट्री’ असल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी निवेदन पाठवले आहे.‌ लोकशाहीमध्ये जनता ही मालक असते व शासकीय अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असतात. सामान्य नागरिक हे काही कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये जात असतात. या ठिकाणी त्यांना योग्य व सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

मुंबईतील मंत्रालयासह राज्यात ठिकठिकाणी अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्या ठिकाणी कामानिमित्त दररोज लाखो नागरिकांचे येणे-जाणे असते, मात्र बहुतांश शासकीय कार्यालयांच्या आवारात सर्वसामान्यांच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पार्किंगसाठी नागरिकांना परिसरात खूप वेळ जागा शोधत फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांना (Pune News) प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, याकडे नाही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Pune : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार अंगीकृत करा – हभप पुनम जाचक

बहुतेक शासकीय कार्यालयांच्या आवारात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी नागरिकांची वाहने उभी करण्यासाठी देखील पुरेशी जागा देता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून येते, असे नाईक यांनी म्हटले आहे.

लोकसेवक असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी मात्र शासकीय कार्यालयांच्या आवारात ठिकठिकाणी छत असलेले राखीव पार्किंग पाहायला मिळते. लोकशाहीमध्ये लोकसेवकांचा हा डामडौल मोडून काढण्यासाठी राज्य शासनाने शासकीय कार्यालयांच्या आवारातील पार्किंग बाबत धोरण निश्चित करावे. शासकीय कार्यालयांच्या आवारात जागा नसेल त्या ठिकाणी बहुमजली वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.