Pune News : धायरीत लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान

एमपीसी न्यूज – पुण्यातील नऱ्हे – धायरी येथील अभिनव कॉलेज परिसरातील एका कारखान्याला आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारखान्याचे आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले.

10 हजार स्के. फूट असणाऱ्या या कारखान्यात एकूण 4 कंपन्या होत्या. यामध्ये वाढदिवसाच्या पार्टी पॉप फटका बनविण्याची, फर्निचर, इंडस्ट्रियल मटेरियल, स्टील फर्निचर अशा कंपन्या होत्या.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना आग नियंत्रनात आणण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करीत होते. यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन टँकरच्या फवाराच्या माध्यमातून स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला.

आगीच्या धुराचे लोट लांबवर पसरल्याने परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या वाहनांना रस्ता मिळण्यास अडचण निर्माण येत होती. सिंहगड रस्ता पोलिसांनी बघ्यांना बाजूला करीत अग्निशमन दलाच्या वाहनांना रस्ता करून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.