-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : कात्रज येथे वृक्ष कोसळून 22 दुचाकींचे नुकसान

या घटनेत कोणीही जखमी तसेच जीवितहानी झाली नाही

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : पुण्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे आज शुक्रवारी दुपारी कात्रज येथील चौगुले इंडस्ट्रीजजवळ मोठे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत झाडाखाली अडकलेल्या व नुकसान झालेल्या 22 दुचाकी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही तसेच जीवितहानी झाली नाही.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

कात्रज येथे एक मोठे झाड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशन दलाचे प्रभारी अधिकारी सुभाष जाधव, रामदास शिंदे, चालक गोगावले तसेच जवान महादेव मांगडे, पंकज इंगवले, प्रसाद कदम व देवदूत जवान निलेश तागुंदे, श्रीकांत वाघमोडे, अविनाश लांडे आदींनी घटनांसाठी धाव घेतली. त्यामुळे वृक्ष बाजूला करून त्या खाली अडकलेल्या व नुकसान झालेल्या २२ दुचाकी बाहेर काढल्या. या सर्व दुचाकींचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही तसेच जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.