Pune News: पुणेकरांना बाप्पा पावला; धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर

Pune News: Dams in Pune on the way to 100 percent filling या धरणांत सध्या 91.59 टक्के पाणीसाठा झाला आहे. रोज धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे.

एमपीसी न्यूज – पुणेकरांवर निर्माण झालेले पिण्याच्या पाण्याचे संकट बाप्पांच्या आगमनापूर्वीच दूर झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांत सध्या 91.59 टक्के पाणीसाठा झाला आहे. रोज धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे.

खडकवासला 1.96 टीएमसी (99.16 टक्के), पानशेत 10.65 टीएमसी (100 टक्के), वरसगाव 11.41 टीएमसी (89 टक्के), टेमघर 2.68 टीएमसी (72.40 टक्के) या चारही धरणांत 26.70 टीएमसी म्हणजेच 91.59 टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.11 टीएमसी (99.88 टक्के) पाणीसाठा होता, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली. ही आकडेवारी आज सकाळी 6 पर्यंतची आहे. जून आणि जुलै महिन्यात दांडी मारणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात दमदार हजेरी लावली.

त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा दोन वेळचा प्रश्न आता मिटला आहे. सोबतच दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळणार आहे. आणखी काही दिवस धरणांत दमदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.