Pune News : पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

स्वप्निल राजु चव्हाण (वय 24, रा. दांडेकर पुल, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेकर पुलाजवळ एकजण पिस्तुल घेऊन थांबला असल्याची माहिती दत्तवाडीचे पोलीस कर्मचारी शिवाजी क्षिरसागर व राहुल ओलेकर यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक देवीसास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, कर्मचारी कुंदन शिदे, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून त्याला पकडले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस असा 30 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.