Pune News: जम्बो सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर, मात्र खराडी येथे 250 बेडचे विलगीकरण केंद्र सुरु

एमपीसी न्यूज: शहरात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अवघी 3 टक्के आहे. त्यामळे महापालिका कोविड सेंटर व सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयात कोविड बेड रिकामे आहेत. त्यामुळे जम्बो सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे सौम्य लक्षण असलेल्या कोरोना बाधितांसाठी खराडी येथे 250 बेडचे एक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

शहरात बाधितांचा आकडा वाढत असला तरी रुग्णालयांत दाखल होणाऱ्याचा दर 3.75 टक्के इतका कमी आहे. बहुतांश बाधित गृह विलगीकरणात आहेत. पालिकेने पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणे शहरात लक्षण विरहित बाधितांसाठी विलगीकरण कक्ष क्षेत्रीय कार्यालय नुसार विलीगीकरण केंद्र सुर केली आहे. त्याप्रमाणे आता हि महापालिका शहरातील पाच परिमंडळांअंतर्गत (झोन) प्रत्येकी एक विलगीकरण केंद्र सुरू करणार आहे. मात्र सध्या आवश्यकते नुसार पालिकेने रक्षकनगर क्रीडा संकुल, खराडी येथे 250 बेडचे  कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी सध्या बाणेर येथील कोविड रुग्णालयातील लक्षण नसलेले रुग्ण हलवण्यात येत आहेत. गरज पडल्यास इतर 4 केंद्र देखील सुरु करण्यात येतील, अशी माहिती महापालिका अयोग्य विभागाकडून देण्यात अली आहे.

प्रस्तावित विलगीकरण केंद्र प्राथमिक क्षमता
बनकर शाळा, हडपसर 300
अग्निशामन वसतिगृह, गंगाधाम 200
डॉ. आंबेडकर वसतिगृह 200
शरद पवार ई लर्निंग स्कूल 200

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.