Pune News : मतदानासाठी शिक्षकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करा- डॉ. रघुनाथ कुचिक

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र विधान परिषदेवर शिक्षक व पदवीधर मतदारामधून उमेदवारांची निवड करण्यासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी सार्वजनिक मतदान होत आहे. या दिवशी सर्व शिक्षक,पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी शिक्षकांना जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला निवेदन पाठविले आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव, सहाय्यक कामगार आयुक्त, पुणे आणि मुख्य निवडणूक अधिकारी पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघ यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 1 डिसेंबर मतदान होणार आहे.

या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिक्षकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी डॉ. कुचिक यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.