Pune News : पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा – आमदार रोहित पवार

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा जिथं सुरु केली, त्या पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी या मागणीसाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व सांस्कृतिक कार्यमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्वीटर करुन माहिती दिली. ते म्हणाले, याबाबत लवकरच एक आढावा बैठकही होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळं महात्मा फुले वाड्यात सुंदर स्मारक उभं राहिलं.

त्याप्रमाणे ज्या वाड्यात मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटली त्या वास्तूचंही रूपांतर भव्य स्मारकात व्हावं, अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे ते म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

रोहित पवार यांनी या मागणीसाठी दुसऱ्यांदा त्यांची भेट घेतली.

यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, सावता परिषदेचे कल्याण आखाडे व ओबीसी सेलचे राज राजापूरकर उपस्थित होते.

पक्षाचा ओबीसी सेल, समता परिषद, इतर सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.