Pune News : आवक असूनही फुलांना मागणी कमी

एमपीसी न्यूज – मार्केटयार्डातील घाऊक फुलबाजारात सर्व फुलांची साधारण आवक होत आहे. अधिक मास सुरू असल्याने फुलांना मागणी कमी आहे.

याकाळात सणवार नसतात तसेच लग्नकार्य कमी प्रमाणात असल्याने पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहिल. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने लावलेल्या हजेरीचा फटका फुलांना बसत आहे.

झेंडू, शेवंती आदी फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. शहरासह राज्यातील मंदिरे उघडल्यास फुलांच्या मागणीत वाढ होईल. त्यानंतर फुलांच्या भावात सुधारणा होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फुलांचे प्रतिकिलोचे दर :
झेंडू : 10-20, गुलछडी : 10-50, अष्टर : जुडी 15-25, सुट्टा 60-100, कापरी : 10-30, शेवंती : 20-50, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-20, गुलछडी काडी : 10-20, डच गुलाब (20 नग) : 30-50, लिलि बंडल : 6-10,  जर्बेरा : 5-15.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.