Pune News: माती, पाणी व पानदेठ परीक्षणासाठी ‘अ‍ॅग्रो अ‍ॅम्ब्युलन्स’चे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माती, पाणी व पानदेठ परीक्षण फिरत्या प्रयोगशाळेचे (अ‍ॅग्रो अ‍ॅम्ब्युलन्स) लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन येथे आज झाले.

 या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त  मुख्य  कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख इत्यादी प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी अशी नावीन्यपूर्ण योजना करणारी पुणे जिल्हा परिषद व कृषी विभाग ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे तसेच ही अ‍ॅम्ब्युलन्स शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती, पाणी परिक्षण करून त्याचा अहवाल जागेवरच देणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेची व पैशांची बचत होणार आहे, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.