Pune News : ‘फिरत्या माती-पाणी प्रयोगशाळे’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.10) फिरते माती-पाणी प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांना माती परीक्षण तसेच पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबराव वायकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.