Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा साहित्याचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नगरसेवक हाजी गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. पुणे महानगरपालिका व नॅशनल हॉस्पिटलच्या सेवेत या सुविधा दाखल होणार आहेत.

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात ‘कोविड-19’ आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे, नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय व नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.