Pune News : पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याची सोशल मीडियावर बदनामी, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेत शहर अभियंता म्हणून कार्यरत असलेले प्रशांत वाघमारे यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक खोटा (Pune News) आणि चुकीचा मजकूर टाकून बदनाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत वाघमारे (वय 54, रा. रोहन निलय, औंध) यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi Crime News : गाईंना  बेशुद्ध करत कत्तलीसाठी घेऊन जाणारी मुंबईची टोळी गजाआड

प्रशांत वाघमारे हे पुणे महानगरपालिकेत शहर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे घरे आणि झोपडपट्ट्या यांच्याविरुद्ध ठोस कारवाई केल्याने ट्विटरवर त्यांचे विषयी बदनामीकारक मजकूर टाकला असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी Legal Rights Observatory LRO या ट्विटर अकाउंट धारका विरोधात (Pune News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.