Pune News: चिकण, मटण, मासळीला मागणी वाढली

आवक घटल्याने चिकनचे दर प्रतिकिलोमागे 50 रुपये तर अंड्याचे दर शेकड्यामागे 50 ते 60 रुपयांनी वाढले आहेत.

एमपीसी न्यूज – आता गणेशोत्सव संपल्याने चिकन, मटण आणि मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक घटल्याने चिकनचे दर प्रतिकिलोमागे 50 रुपये तर अंड्याचे दर शेकड्यामागे 50 ते 60 रुपयांनी वाढले आहेत. मासळीमध्ये सुरमई वगळता अन्य मासळीचे दर स्थिर आहेत. तिच्या मागणीत 50 टक्क्यांनी वाढ झाल्याने भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, मटणाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी खोल समुद्रातील 10 ते 12 टन, खाडी 200 ते 400 किलो तर नदीतील 700 ते 800 मासळीची आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला व सिलनची सुमारे 12 टन आवक झाली असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :

पापलेट : कापरी : 1400, मोठे 1000, मध्यम : 750, लहान 480-550, भिला : 400, हलवा : 440-480, सुरमई : 600, रावस : लहान 600, मोठा : 800, घोळ : 550, भिंग : 450, करली : 320, करंदी : 160, पाला : 1100-1200, वाम : पिवळी लहान 480 मोठी 600, काळी : 280, ओले बोंबील : 140-160, कोळंबी : लहान 200-280, मध्यम 360-440, मोठे 550-650, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1000, मोरी : 360, मांदेली : 160.

राणीमासा : 280, खेकडे लाल : 240, चिंबोर्‍या : 480-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 280, खापी : 200-240, नगली : 480, तांबोशी : 480, पालू : 240, लेपा : 240, शेवटे : 240, बांगडा : 320 , पेडवी : 100, बेळुंजी : 160, तिसर्‍या : 240, खुबे : 140-160, तारली : 160. नदीची मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 480.

शिवडा : 240, खवली : 240, आम्ळी : 160, खेकडे : 200 वाम : 550. चिकन : चिकन : 200, लेगपीस : 240 जिवंत कोंबडी : 160, बोनलेस : 300. अंडी : गावरान : शेकडा : 680 डझन : 90 प्रति नग : 7.5, इंग्लिश : शेकडा : 475 डझन : 66 प्रतिनग : 5. मटण : बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.