Pune News : खासगी शाळेतील शिक्षकांची मोफत कोरोना टेस्ट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील बहुतांश महापालिकेसह खासगी शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्यसरकारने परवानगी दिली आहे. परंतु सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना टेस्ट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोफत टेस्ट होत असली तरी खासगी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मात्र खिशावर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोफत टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाकडून शहर ‘झिरो कंटेन्मेंट झोन’ केले आहे. तसेच जम्बो कोविड केयर सेंटरसह शहरातील कोविड सेंटरची संख्या घटविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्यसरकारकडून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी इयत्तेच्या शाळा महाविद्यालये सुरू करण्याचे आदेेश दिले आहेत. तत्पुर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना लॉकडाऊन आणि अनलॉक कार्यकाळात शाळा पुर्णत: बंदच होत्या. तसेच काही पालकांकडून विद्यार्थ्यांचे शुल्क भरले नसल्यामुळे अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन झालेेले नाहीत. या आर्थिक टंचाईमुळे काही जणांकडे आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी देखील पैसे नाहीत.

त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून पुणे महापालिकेने सर्व खासगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट मोफत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक  बाळासाहेब बोडके आणि काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.