Pune News: श्रावण महिन्यामुळे फळांना मागणी वाढली

Pune News: Demand for fruits increased due to Shravan month आवक वाढल्याने मोसंबीच्या भावात अल्पशी घट झाली आहे. उठाव कमी असल्याने इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत

एमपीसी न्यूज – सध्या श्रावण महिना सुरू असल्याने बाजारात फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. आवक घटल्याने लिंबाच्या भावात गोणीमागे 20 रूपयांनी वाढ झाली. आवक वाढल्याने मोसंबीच्या भावात अल्पशी घट झाली आहे. उठाव कमी असल्याने इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी रविवारी दिली.

मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि.9) केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, संत्री 2 टन, डाळिंब 80 ते 90 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सीताफळ 10 टन, खरबूज 5 ते 6 टेम्पो, सफरचंद दीड ते दोन हजार पेटी, प्लम 500 बॉक्स, नासपती 200 पेटी, आंबा चौसा आणि लंगडा मिळून 2200 बॉक्स इतकी आवक झाली.

फळांचे भाव – लिंबे (प्रतिगोणी) : 60-100, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-400, (4 डझन) : 80-150, संत्रा : (3 डझन) : 200-400, (४ डझन) : 80-200, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 20-80, गणेश : 5-20, आरक्ता 10-30. कलिंगड : 5-10, खरबूज : 10-25, पपई : 5-20, चिक्कू : 100-300, सीताफळ : 2-80, सफरचंद – सिमला (25 ते 32 किलो) 3000-4500, पियर (25 किलो) – 2000-3000, प्लम (5 ते 6 किलो) 700-850, नासपती (15 ते 16 किलो ) 800-900, आंबा – चौसा (5 ते 6 किलो ) 600-850, लंगडा (5 ते 6 किलो ) 700-850.

फुलांचे दर स्थिर
फुलबाजारात आवक साधारण असून, पावसामुळे ओला माल जास्त आहे. त्याचा शेवंतीला 50 टक्के फटका बसला. श्रावणामुळे फुलांना मागणी असून, दर टिकून आहेत.

फुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : 50-90, गुलछडी : 25-40, कापरी : 30-60, शेवंती : 10-40, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 10-20, गुलछडी काडी : 10-20, डच गुलाब (20 नग) : 40-50, लिलि बंडल : 4-6, जर्बेरा : 10-20, जुई : 300-400.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.