Pune News : अनावश्यक विकासाची कामे थांबवून सर्व पुणेकरांचे लसीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहर हे कोरोना महामारीचे Hot Spot झाले असून आपण महानगरपालिका म्हणून कोविड सेंटर, जम्बो हॉस्पिटलसह अनेक उपक्रम राबवत आहात. तथापी हा सर्व खर्च व श्रम आपण सतत करत राहणे म्हणजे तात्पुरता उपाय असून या कोरोना साथीला प्रतिबंध करण्यासाठी पुणे मनपाने कायमस्वरूपी तोडगा म्हणून सकारात्मक विचार करून सर्वांना मोफत लस देणे यावर भर द्यायला हवा आहे, असे निवेदन शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे यांनी आयुक्तांना दिले आहे

शहराचा विकास करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच नागरिकांचे आरोग्य हे ही जास्त महत्वाचे आहे. शहरामधील रोज वाढणान्या कोरोना बाधींची परिस्थिती भायावत झाली असून आपण महापालिकेच्या वतीने शासनाकडून मोफत लस मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा तात्काळ लसीसाठी सिरम इन्स्टिट्यूटशी / वा अन्य कंपनीशी बोलणी करून त्यांना order द्यावी. पुणे शहरातील 18 वर्षावरील नागरिकांची संख्या साधारणतः 25 लाख इतकी असून प्रत्येकी 2 डोस म्हणजेच 50 लाख लस आपल्याला लागतील यासाठी 400 रु. प्रति लस जरी मिळाली तरी 200 कोटी रु. खर्च मनपाचा होऊ शकतो.

पुणेकरांचे आरोग्य हे मनपाचे प्राधान्यच असायला हवे अनावश्यक विकासाची सर्व कामे तात्काळ बंद करून सिरम इन्स्टिटयूट किंवा इतर कोणत्याही कोरोना लस तयार करणाऱ्या कंपनीला 200 कोटी रुपयांचा चेक द्यावा व तात्काळ सर्वाना लस देण्याची मोहीम सुरु करावी. साथ आटोक्यात आणणे हे तात्पुरती मलमपट्टी असून लसीकरण हेच कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे. आज पुणे मनपाने कोरोनमुक्त पुणेकर हेच ध्येय समोर ठेऊन काम करणे हे पुणेकरांना अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.