Pune News : महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या भाजप नगरसेवकांवर कारवाई करण्याची आयुक्तांकडे मागणी

0

एमपीसी न्यूज – महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

वानवडी परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याशी हुज्जत घातली. नगरसेवक घोगरे यांनी बोलताना असभ्य भाषा वापरली व डॉक्टर वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले.भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांच्या या गैरवर्तनाचा सर्वपक्षीय महिला नेत्यांनी निषेध केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment