Pune News : अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीची दौंड-पुणे डेमू तांत्रिक कारणास्तव राहणार बंद!

अनिश्चित काळासाठी डेमू राहणार बंद, रेल्वे प्रशासनाची माहिती

एमपीसी न्यूज : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दौंड ते पुणे दरम्यान डेमू रुळावरून धावणार होती. परंतु ही ‘डेमू’ अनिश्चित काळासाठी तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती मध्य रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने या पूर्वी दिलेल्या माहितीनुसार, डेमूच्या चार फेऱ्या दोन्ही दिशांनी होणार होत्या. पुण्यातून सकाळी 6 व सायंकाळी 5.20 व दौंडहून सकाळी 7.50 व रात्री 7.15 वाजता डेमू सुटेल, असे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यानुसार अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रवासाकरिता जय्यत तयारीही केली होती.

मात्र अगदी आयत्यावेळी डेमू रद्द केल्याने त्यांची घोर निराशा झाली असून त्यांचे हाल सुरूच राहणार आहेत. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत पुणे-दौंड डेमू सेवा बंदच राहील, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.