Pune News : पावसाळी वातावरणामुळे डेंग्यूचा प्रादुर्भावात वाढ

एमपीसी न्यूज – शहरात पावसाळी वातावरणा बरोबर डेंग्यू, चिकुनगुनिया चा प्रादुर्भाव वाढत आहे. जानेवारीपासून शहरात डेंग्यूचे एक हजार संशयित आढळून आले आहेत. यात 36 रुग्णना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले असून चिकुनगुनियाचे 40 रुग्ण आढळून आले आहेत.

शहर परिसरात सततच्या पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगांचा फैलाव शहरात सुरु झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात डासांमुळे पसरणार्‍या रोगांचे प्रमाण चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे .

गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढल्यामुळे आरोग्य विभागापुढील आव्हान वाढले आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढायला सध्याचे हवामान आणि सतत पडणारा पाऊस कारणीभूत ठरत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या आजाराला पोषक वातावरण तयार झाले असल्याचे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही पालिकेकडून केले जात आहे.

तसेच डासोत्पत्तीची ठिकाणे, कचरा, घाणीची ठिकाणे शोधून तेथे औषधांची फवारणी केली जात आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोसायट्यांना भेट देऊन माहिती देणे, भित्ती पत्रके लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. इमारतींच्या टेरेस, बाल्कनीमध्ये तसेच आवारात पाणी साठण्याची ठिकाणी शोधून तेथे पाणी राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

खासगी लॅब आणि रुग्णालयांकडून या आजारांची माहिती घेतली जात आहे. या आजारांच्या रुग्णांचे रिपोर्ट घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन घराची आणि परीसराची पाहणी केली जात असल्याचे पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येते असून डासांची उत्पत्ती स्थळ आढळ्यास संबधित आस्थापना नोटीस देण्यात येत आहे,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.