Pune News : उपायुक्त सुरेश जगताप यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपद पदोन्नतीने भरण्यात आलं आहे. उपायुक्त सुरेश जगताप यांना अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्याची शिफारस पुणे महापालिकेच्या वतीने राज्यसरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य नगरविकास विभागाच्या समितीने शिफारस मान्य करत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान आजच शांतनु गोयल यांची नागपूर येथील मनरेगा आयुक्तपदावर बदली झाली. त्यामुळे रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदवर तातडीने सुरेश जगताप यांना रूजू करावे असे स्पष्ट आदेश शासननिर्णयात देण्यात आले आहोत.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जगताप यांनी महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:स्सारण विभागासह विविध विभागांमध्ये प्रमुखपदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.