Pune News : वाळू माफियांचे धाबे दणाणले, अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 60 लाखाच्या फायबर बोटी नष्ट

एमपीसी न्यूज – दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या वाळू माफियांच्या तब्बल 60 लाख रुपये किमतीच्या यांत्रिकी सायबर बोटी जिलेटिनचा स्फोट घडवून आणून नष्ट केले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राजेगावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तडीपार आरोपी विष्णू उर्फ लाला बलभीम अमनर हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही साथीदारांसह अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने भीमा नदीच्या पात्रातच छापा घातला.

यावेळी त्या ठिकाणी आढळलेल्या यांत्रिकी फायबर बोटी महसूल कर्मचाऱ्याच्या मदतीने जिलेटिनचा स्पोर्ट कडून नष्ट केल्या आहेत. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार संतोष शिंदे करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.