Pune News : देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार ! : चंद्रकांत पाटील यांची धक्कादायक घोषणा

एमपीसी न्यूज : पुण्यात अनेक नेते मंडळी घडले आहेत. कुठे ही घटना घडली की त्याच नातं पुण्याशी जोडले जाते. हे पाहिले असून पुणे सर्वार्थाने प्रगतीचे शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे. पण देवेंद्र जी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मिश्किलपणे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

बालगंधर्व रंगमंदीर येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट भाषण करताना म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठे काही हो आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात. अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणुक झाली. जो बाईडन राष्ट्रपती झाले तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने जोडले राष्ट्रपती जो बाईडन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते. अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बर का देवेंद्र तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्याचे असे म्हणताच सभागृहात एकच पिकला.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाषणाची सुरुवात करताना गिरीश बापट यांच्या विधानाचा धागा पकडत ‘देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार’ ही धक्कादायक घोषणा केल्यामुळे बर्‍याच दिवसांनी पुणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमात कोपरखळ्या आणि चिमटे काढणाऱ्या भाषणांची अनोखी मेजवानी मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.