Pune News : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ; चंद्रकांत पाटील यांची मागणी

0
_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी चूकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी कोथरुडचे आमदार भाजप प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप असून त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही ह्क्क नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटरवरून हि मागणी केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशाप्रकारे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. ‘

‘गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही.’ असे चंद्रकात पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, रेणु शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत ते आरोप खोटे असल्याचे म्हटलं आहे. मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबत खुलासा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.