Pune News : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मागितली जाहीर माफी

एमपीसी न्यूज – दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या घरी गणपती बप्पांचे आगमन झाले. पण, गणपती बप्पांच्या पाटाखाली देशाचे संविधान ठेवल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले. अखेर प्रवीण तरडे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत झालेल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओत आपल्या हातातून झालेली चूक मान्य केली आहे.

‘मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवले होते. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होता. पण, ती खूप मोठी चूक होती’ अशी कबुली तरडेंनी दिली.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3424585744229343&id=100000338537393

तसंच, ‘या प्रकारानंतर अनेकांचे फोन आले, एसएमएस आले. त्यांच्या भावना समजून गणपतीच्या पाटाखाली ठेवण्यात आलेले संविधान हे आदरपूर्वक बाजूला केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

यापुढे अशी चूक होणार नाही’ असी ग्वाहीही तरडे यांनी दिली. तसेच यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची मी जाहीर माफी मागतो, असे प्रवीण तरडे म्हणाले.

प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. गणरायाच्या मूर्तीच्या बाजूला चारही बाजूने पुस्तकं सजवली आहे. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले होते.

संविधान गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने प्रविण तरडे हे सोशल मीडियावर ट्रोल झाले. सोशल मीडियावर प्रविण तरडे यांच्यावर लोकांनी जोरदार आक्षेप घेतला.

देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला, असा जबाब लोकांनी त्यांना विचारला.

दरम्यान, प्रवीण तरडे यांनी आपली चूक मान्य करत जाहिर माफी मागितली असून त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो देखील फेसबुकवरून हटवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.