Pune News: पुणे-बेंगळुरु महामार्गावर घाणीचे साम्राज्य

Pune News: dirt on Pune-bengaluru highway महामार्गाची हद्द ही पुणे महापालिकेच्या हद्दीत बावधन ग्रामपंचायत हद्दीत येते. महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाषाण तलाव परिसरातील बावधन हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मनसेचे बाणेर-बालेवाडी पदाधिकारी अनिकेत मुरकुटे आणि अभिजित चौगुले यांनी या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

मागील काही महिन्यांपासून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कचरा आणून टाकला जात आहे. गाद्या, रॅबिट, राडारोडा, चिनी मातीची तुटलेली भांडी, कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे.

महामार्गाची हद्द ही पुणे महापालिकेच्या हद्दीत बावधन ग्रामपंचायत हद्दीत येते. महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. परिसरातील कचरा बावधन ग्रामपंचायत आणि महापलिकेच्या सहकार्याने साफ केला जाईल, असे कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.