Pune News : पीएमपीएमएल बदली कामगारांना अन्नधान्य किटचे वाटप

बदली सेवकांना पाच महीने काम नसल्याने पगार मिळत नव्हता.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘पीएमपीएमएल’ कामगारांना न. ता. वाडी आगार सेवकांच्या वर्गणीतून सोमवारी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. तसेच बदली सेवकांना प्राधान्याने कामावर रूजू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांचा सत्कार न. ता. वाडी राष्ट्रवादी युनियन अध्यक्ष गणेश बंडीवडार यांच्या हस्ते करण्यात आला.

बदली सेवकांना पाच महीने काम नसल्याने पगार मिळत नव्हता. त्यामुळे न. ता. वाडी आगार सेवकांच्या वर्गणीतून गरजू बदली सेवकांना सोशल डिस्टन्स, मास्क व नियमांचे पालन करत एक महीन्याचे अन्नधान्य किट मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.

आगार व्यवस्थापक झेंडे, शितोळे, कुदळे, पीएमपीएमएल राष्ट्रवादी युनियचे अध्यक्ष किरण थेऊरकर, सरचिटणीस सुनिल नलावडे, उपाध्यक्ष कैलास पासलकर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गायकवाड, पप्पू केदारी, विकास कुंभार, रूपाली धापटे, गणेश सांगळे, हेमंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, मागील 5 ते 6 महिन्यांपासून पीएमपीएमएल बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. बसेस सुरू होण्यासाठी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, आयुक्त, व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आता बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या हाताला रोजगार मिळाल्याचे दीपाली धुमाळ म्हणाल्या.

या बसेसचा आता सामान्य नागरिकांनाही फायदा होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.