Pune News: रिक्षाचालकांना सुरक्षा किटचे वाटप

एमपीसी न्यूज – कसबा ब्लॉक काँग्रेसतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी वर्ष निमित्ताने कोरोना संसर्गमुळे अडचणीत सापडलेल्या रिक्षा चालकांना सुरक्षा पडदा, सेनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले. आतापर्यंत 100 रिक्षाचालकांना ही मदत करण्यात आली आहे. प्रवासी आणि चालक दोघे सुरक्षित प्रवास करावेत, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

कसबा मतदार संघातील 1000 रिक्षा चालकांना हे साहित्य देण्याचा मानस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे यांनी व्यक्त केला. गोविंद हलवाई चौकातील रिक्षा स्टँडवर हा उपक्रम पार पडला.

यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, भाऊसाहेब करपे, नरेश नलावडे, प्रशांत सुरसे, सागर सासवडे, ऋषिकेश वीरकर, सौरभ अमराले, सुरेश कांबळे, चेतन अगरवाल, शाबीर खान आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like