Pune News: तीन पायांवर चालत होती गाय, बसवला कृत्रिम पाय

Pune News: doctors fits artificial limb to handicapped cow in Chouphula ग्रामस्थांनी या गायीची स्थिती पाहून तिला पुण्यातील संचेती रूग्णालयातील प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स विभागातील डॉक्टरांना दाखवलं.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यात तीन पायांच्या एका अपंग गायीला कृत्रिम पाय बसवून नवे जीवन देण्यात आले आहे. आता ती गाय फक्त उभीच राहू शकत नाही तर चालण्याचीही तिच्यात क्षमता निर्माण झाली आहे. या गायीच्या पुढच्या पायाच्या गुडघ्याच्या खालचा भाग नव्हता. कृत्रिम पाय लागल्यानंतर ही कमतरता दूर झाली आहे. ही गाय आता चालण्या-फिरण्यास सक्षम झाली आहे.

पुण्यामधील चौफुला गावातील एका गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आला आहे. या कृत्रिम पायाच्या मदतीने लवकरच ही गाय आता चार पायांवर चालू शकणार आहे. तीन पायांच्या या अपंग गायीवर 2 ऑगस्ट रोजी हा कृत्रिम पाय बसवण्यात आला.

पुण्यातील चौफुला येथील प्राण्याच्या शेल्टर होममध्ये एका गायीवर हा कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे. ही गाय अपंग असून तिला तीनच पाय होते. ग्रामस्थांनी या गायीची स्थिती पाहून तिला पुण्यातील संचेती रूग्णालयातील प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स विभागातील डॉक्टरांना दाखवलं.

या विभागाकडून याआधी माणसांसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आले होते. या विभागातील डॉक्टरांनी देखील या गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्याचं आव्हान स्वीकारलं. त्याचप्रमाणे सर्व उपचार मोफत देण्यात आले.

संचेती रुग्णालयाच्या प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. सलिल जैन म्हणतात, “कृत्रिम पाय तयार करण्यासाठी आम्ही त्या पायाचं माप दोन आठवड्यांपूर्वीच घेतलं. माझ्या टीमने गायीच्या शरीररचनेचा अभ्यास केला आणि त्यानंतर कृत्रिम पायाची रचना तयार केली.

वजनदार प्राण्यांच्या अवयवांची रचना करणं अवघड असतं. कृत्रिम पाय लावल्यावर ही गाय आता उभी राहण्यास सक्षम असून ती हळू हळू चालू शकते. परंतु, या कृत्रिम पायाशी जुळवून घेण्यासाठी तिला जवळपास एका महिन्याचा कालावधी लागेल. तसंच आम्ही तिच्या पायाच्या हालचालींवर आणि त्यामध्ये होणाऱ्या प्रगतीवर लक्ष ठेवत आहोत.

ग्रामस्थ अमर जगताप ज्यांनी या गायीच्या कृत्रिम पायाच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. त्यांनी म्हटलं की, “चौफुला गावातील प्राण्यांच्या शेल्टर होमला मी भेट दिली होती. त्यावेळी मी या गायीला पाहिलं. ती फार अशक्त वाटत होती. शिवाय तिला योग्य पद्धतीने चालताही येत नव्हतं. तिची ही परिस्थिती पाहता मी तिला रूग्णालयात घेऊन गेलो.

यावेळी इतर गावकऱ्यांनी देखील मला मदत केली. आता कृत्रिम पाय लावल्यानंतर आम्ही रोज तिच्यावर लक्ष ठेऊन आहोत. तिच्या दररोजच्या हालचालींबद्दल आम्ही रूग्णालयाला माहिती देत असतो. तिला तंदुरुस्त आणि तिच्या चारही पायांवर उभं राहिलेलं पाहायचं आहे.”

प्राण्यांवर करण्यात येणाऱ्या या अवघड प्रक्रियेबद्दल विचारलं असता डॉ. जैन म्हणाले, “प्राण्यांवर अशा पद्धतीचे उपचार करायचे म्हणजे एखाद्या लहान मुलावर उपचार करण्यासारखं असतं. कृत्रिम अवयव स्वीकारला आहे की नाही हे पाहण्यासाठी तासन्तास जनावरांचं निरीक्षण करावं लागतं.

त्याशिवाय त्यांना कोणत्या समस्या उद्भवत आहेत का, हे देखील पाहिलं जातं. प्राण्यांच्या कृत्रिम अवयवांबद्दल अजून खूप संशोधन गरजेचं आहे. अशा प्रकरणानंतर आम्ही अधिक संशोधन करू आणि भविष्यात अशा गरजू प्राण्यांवर या पद्धतीचे उपचार करू.

टीमने दिलेल्या माहितीनुसार, कृत्रिम पायासोबत जुळवून घेण्यासाठी आणि योग्य पद्धतीने चालण्यासाठी या गायीला एक महिना लागेल.

संचेती इन्सिटट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक आणि रिहॅबिलीटेशनचे प्रमुख डॉ. पराग संचेती यांच्या सांगण्यानुसार, “कृत्रिम अवयव मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ आहे. जास्त वजन असलल्या प्राण्यांसाठी प्रोस्थेटिक्स एक असामान्य गोष्ट आणि आव्हानात्मक कार्य आहे.

प्राण्यांवर हे करण्यासाठी अनेक चाचण्या व त्रुटी पडताळून पाहणं आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी एका तीन पायांच्या गाढवावर आम्ही ही प्रक्रिया केली होती. गाढवाला कृत्रिम पाय बसवल्यावर यश मिळाल्यानंतर यावर्षी आम्ही गायीवर ही प्रक्रिया केली. माझी आशा आहे की, यापुढे अशा समस्या असलेल्या अनेक प्राण्यांना आम्ही मदत करू शकू.

दरम्यान, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी रूग्णालयाच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, प्राण्यांसाठीच्या कृत्रिम गोष्टी तयार करण्यासाठी अधिकाधिक संशोधन केलं पाहिजे.

पेटा इंडियाचे सीईओ मणिलाल वल्लीयाते याविषयी म्हणाले, “प्राण्याची अधिक काळजी घेतल्याबद्दल आम्ही रूग्णालयाचं कौतुक करतो. वजनदार प्राण्यांसाठीच्या कृत्रिम पायाची प्रक्रिया आव्हानात्मक असते. यामध्ये वजनाचा योग्य प्रमाणात समतोल राखण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. जनावरांसाठी देशात असे आणखी काही उपक्रम आवश्यक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.