Pune News : डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना वेळेत पगार नाही 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रुग्णांची सेवा देण्यासाठी पुणे मनपाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी, सेंटर हॉस्पिटल, आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर नर्सेस व इतर कर्मचारी यांना कामावर घेतले. मात्र, मनपाकडून त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. 

इतर मनपासारखे त्यांना जादाची पगारवाढ द्यावी, वैद्यकीय सेवा एखाद्या कर्मचार्‍याला पूर्ण झाल्यास त्याला पगारी रजा द्यावी, अतिदक्षता विभागात डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावे, आय.सी.यु मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना भत्ता द्यावा, अशा अनेक मागण्या महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.

डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचा-यांना कोरोना झाल्यास त्यांना पुणे शहरातील कोणत्याही रुग्णालयात मोफत सेवा देण्यात यावी, डॉक्टरांचे वेळेवर पगार न झाल्यास किंवा ते डॉक्‍टर नोकरी सोडून गेल्यास या प्रकरणाची सर्वस्व जबाबदारी आपली राहील याची दक्षता घ्यावी, इतर मनपाप्रमाणे डॉक्टरांच्या पात्रतेनुसार पगारात वाढ करून वेळेवर देण्यात यावा, असे विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.