_MPC_DIR_MPU_III

Pune News: जनतेला मंदिरांची कुलुपे तोडायला भाग पाडू नका – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात दोनशेपेक्षा जास्त धर्मस्थळांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. “मद्यालय खुली आणि देवालय बंद” या ठाकरे सरकारच्या अत्यंत जुलमी कार्यपद्धतीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या आंदोलनातून तीव्र रोष व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पर्वती मतदार संघातील सारसबाग सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारला जाग यावी आणि देवालय सुरू करण्याची बुद्धी या सरकारला मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शाहीर श्रीकांत रेणके आणि त्यांचे सहकारी यांनी गोंधळ सादर केला.

सर्व धर्मस्थळे नागरिकांसाठी ताबडतोब खुली करावीत, अशी मागणी जगदीश मुळीक यांनी यावेळी केली. अन्यथा सर्वसामान्य पुणेकर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला यापुढे अजून प्रखर आंदोलन उभे करावे लागेल. तसेच सर्वसामान्य जनतेच्या संयमाची परीक्षा ठाकरे सरकारने घ्यायचा प्रयत्न करू नये. जनतेचा धीर सुटला तर जनता स्वतः मंदिरे व सर्व धर्मस्थानांची कुलपे तोडायला उद्युक्त होईल, असा इशाराही जगदीश मुळीक यांनी दिला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहर खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या नेतृत्वाखाली ओंकारेश्वर मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हेही या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले होते.

कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे आमदार  सुनील कांबळे यांनी वानवडी येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले. शिवाजीनगर मतदार संघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली कमला नेहरू पार्क जवळील दत्त मंदिरासमोर घंटानाद करण्यात आला. खडकवासला मतदार संघाचे आमदार  भीमराव तापकीर यांनी त्या मतदार संघातील कार्यकर्त्यांबरोबर धनकवडी ग्रामदैवत जानुबाई देवी मंदिराच्या समोर जनतेचे गाऱ्हाणे मांडले

पुणे शहरात दोनशेच्यावर मंदिरे व धर्मस्थान समोर झालेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.