Pune News : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला कोविड-19 लसीचा दुसरा डोस

एमपीसी न्यूज – कोव्हिड – 19 चा प्रतिकार करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने नागरिकांना 1 मार्च पासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आज दि. 25 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे महानगर पालिकेचा कमला नेहरु रुग्णालय येथे जाऊन कोविड -19 लसीचा 2 रा डोस  घेतला.

कमला नेहरु रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. लता त्रिंबके देखरेखीनुसार परिचारीका वंदना चक्रनारायण यांनी लस दिली. कोविड लसीकरण पुणे शहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. सुर्यकांत देवकर व डॅा. जयश्री पाटील, यांनी योग्य मार्गदर्शन करुन चोख व्यवस्था ठेवली होती.

साधन सामुग्री कामाबद्दल पुढच्या काळात सहकार्य करणार आहे असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले तसेच लसीकरणाची एकूण व्यवस्था हॉस्पिटल प्रशासनाचे व महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त रूबल अग्रवाल यांचे आभार मानले असून सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी पल्लवी जावळे नगरसेविका, शेखर जावळे शिवसेना पदाधिकारीही हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.