Pune News : ड्रग्ज प्रकरणी मुळापर्यंत जाण्याची गरज – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – केवळ चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही. ड्रग्ज प्रकरणी मुळापर्यंत जायला हवे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवनापासून मी तंबाखू विरोधात काम करीत आहे. अशा गोष्टी समाजात असूच नये, असे माझे स्पष्ट मत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आपण तंबाखूमुक्त अभियान राबवित आहोत. तसे केंद्र सरकारने ड्रग्समुक्त अभियान राबविण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. तसे झाल्यास तरुण वर्ग ड्रग्ज सारख्या गोष्टींपासून दूर राहील.

सध्या ड्रग्जप्रकरणी हाय प्रोफाईल तीन महिलांना चौकशीसाठी बोलावून, यामधून काहीही साध्य होणार नाही. याला मुळापासून उखडणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. तर, मला, पती सदानंद सुळे, पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनाही नोटीस आली आहे. त्याला आम्ही सविस्तर उत्तर देऊ. दरम्यान, सुशांतसिह आत्महत्या प्रकरणावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.