Pune News : डीएसकेंची पुतणी सई वांजपेला जामीन

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या सहकुटुंब येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहेत. सदर गुन्ह्यात सहआराेपी असलेली त्यांची पुतणी सई वांजपे हिला तब्बल दाेन वर्ष 9 महिन्याने मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचे जातमुचलक्यावर सर्शत जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने वांजपे यांना जामीन मंजूर करताना अटी घातलेल्या असून त्यात पाेलिसांना तपासकामात सहकार्य करणे, न्यायालयाचे परवानगी शिवाय देश साेडून न जाणे, साक्षी पुराव्यांशी छेडाछेड न करणे या गाेष्टींचा समावेश आहे. बांधकाम व्यवसायिक डीएसके यांनी पुण्यातील फुरसुंगी येथील शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ती डीएसकेडीएल या त्यांचे कंपनीला जास्त भावात विकून नफा कमाविण्याचा प्रयत्न केला आणि याकामी त्यांना सई वांजपे या त्यांचे पुतणीने साथ दिली असा दावा पाेलिसांनी केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सई वांजपे यांचे नावाने बॅंक खाते उघडून त्याची पाॅवर ऑफ अ‍ॅटर्नी डीएसकेंची मेहुणी अनुराधा पुरंदरे हिला देण्यात आली हाेती. पुरंदरे हिच्याकडून फुरसुंगी येथील जमीनीचे व्यवहार करण्यात आले. व तिची सही बॅंकेत वापरण्यात आली. त्यामुळे याप्रकरणाशी सई वांजपे यांचा संबंध नसून गैरव्यवहारात त्या लाभार्थी नाहीत असा युक्तिवाद त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी केला. वांजपे यांना 16 मे 2018 राेजी अटक करण्यात आलेली आहे.

सई वांजपे यांचे विराेधातील तपास पूर्ण झालेला असून त्यांचे विराेधात आराेपपत्र व पुरवणी आराेप पत्र न्यायालयात दाखल झालेले आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयास करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.