Pune News : भूसंपादनाअभावी रखडले पालिकेचे 18 रस्ते

एमपीसी न्यूज – शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) 18 रस्ते  भूसंपादनाअभावी रखडल्याचे समोर आले आहे. यातील काही रस्त्यांच्या भूसंपादनासाठी निधी नाही. तर काहीचे भूसंपादन न्यायालयीन लढाईत अडकले आहे.

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच असल्याने अस्तित्वात असलेले रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून रस्त्यांसह उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर यांसह विविध प्रकल्प राबविले जातात. मात्र, अपुरा निधी आणि भूसंपादनाच्या समस्येमुळे अनेक प्रकल्प राखडताना पहिला मिळत आहेत.

शहरातील रखडलेल्या रस्ते व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जवळपास दीड हजार कोटींची आवश्यकता असताना, पालिकेच्या अंदाजपत्रकात केवळ 16 कोटीची तरतूद केली आहे. यामुळे रखडलेल्या प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, याबाबत अनिश्चितता आहे.

महापालिकेचे 18 रस्ते भूसंपादनाच्या चक्रात अडकले आहेत. बहुतांश रस्त्याच्या भूसंपादनासाठी प्रशासनाकडे निधीच नाही. रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भूसंपादन पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, भूसंपादनासाठी 1500 ते 1600 कोटीची गरज असताना महापालिकेच्या अंदाजपत्रकात केवळ 16 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काही रस्त्यांचे भूसंपादन न्यायालयीन प्रक्रीयेत अडकले आहे. यामुळे रखडलेले रस्ते रामभरोसेच आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.