Pune News : ‘त्या’ पराभवामुळे शिंदे फडणवीस सरकारला पुण्याच्या मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा लागला – रविंद्र धंगेकर

एमपीसी न्यूज -कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला( Pune News) पराभवाला सामोरे जावे लागले आहे.त्यामुळे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठकीत  शहरातील मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील अनेक वर्षापासून पुणे शहरातील नागरिकांना  मिळकतकरात सवलत मिळावी.यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो.त्या लढ्याला यश आले असून , अशी माहिती काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहे.त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे.अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजवर मांडत आलो आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेल्यावर तीच मागणी केली होती.

 

 

 

PCMC: नवीन मालमत्ता शोधण्यावर भर; आयुक्तांची माहिती

 

त्या मागणीला काही प्रमाणात तरी यश आल्याचे म्हणावे लागेल.कारण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 40 टक्के मिळकतकरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.पण हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारला केवळ नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.त्यामुळे घ्यावा लागला असून त्यामुळे मी तमाम कसबा मतदार संघातील नागरिकांचा आभारी आहे.

 

तसेच आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.त्याच आता मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे 500 स्क्वेअर फुटाच्या घराना सवलत दिली आहे.त्यानुसार पुणे शहरातील 500 फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी.हीच मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.तसेच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत,अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारला ( Pune News) त्यांनी टोला लगावला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.