Pune News : मेट्रोच्या कामामुळे शहरात आजपासून वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज-शहरातील कोरेगाव पार्क वाहतूक विभागाच्या ( Pune News ) हद्दीत मेट्रोतर्फे सिव्हिल कोर्ट ते रामवाडीदरम्यान पुणे मेट्रो रिच -3  या मार्गिकेवर बंडगार्डन येथे मेट्रो स्टेशनच्या स्टील गर्डरचे काम करण्यात येणार आहे.

 

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचे दोन दिवस असाधारण रजा म्हणून मान्य

 

त्यामुळे शुक्रवार (दि.31) पासून 21 एप्रिलपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. तसेच, एन. एम. चव्हाण चौक ते अॅडलॅब चौकदरम्यान महामेट्रोचे कल्याणीनगर रेल्वे स्टेशनचे काम सुरु आहे. त्यासाठी 27 जूनपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

 

 

कोरेगाव पार्क विभाग, वाहतुकीतील बदल-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग –

  • पुणे स्टेशनकडून येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, पर्णकुटी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
  • पुणे स्टेशनकडून येऊन बोटक्लबकडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रोडने इच्छितस्थळी जातील.
  • बोटक्लब रोडने येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहता रोडने कोरेगाव पार्क चौकातून इच्छितस्थळी जातील.
  • येरवडा येथून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

 

  • येरवडा विभाग, वाहतुकीतील बदल
  • एन. एम. चव्हाण चौकाकडून अॅडलॅब चौकाकडे जाणारी वाहतूक तसेच अॅडलॅब चौकाकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार गरज पडल्यास बंद करण्यात येणार आहे.

    पर्यायी मार्ग

    • बिशप स्कूलकडून एन.एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड अॅडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक ७ येथून डावीकडे वळून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाईल.
    • ए.बी.सी. चौकाकडून येणारी वाहतूक एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळून ( Pune News ) कल्याणीनगर लेन क्रमांक 3 येथून उजवीकडे वळून अॅडलॅब चौकाकडे जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.