Pune News: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ दुर्गा बिग्रेडचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पुण्यात आंदोलन करण्यात आले.

मुंबईहून येणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. पीडित मुलीला शक्ती कायद्यानुसार 21 दिवसाच्या आत लवकरात लवकर शासनाने न्याय द्यावा. शहरांमध्ये नोकरी, शिक्षणानिमित्त अनेक तरुणी आहेत. या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने योग्य ती सुरक्षा योजना करावी. शहरातील तरुणी भयभीत अवस्थेत आहेत. अनेक मुली बाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे मुख्य सरचिटणीस अभय भोर म्हणाले.

लाखो महिला कामानिमित्त बाहेर असतात. रात्री उशिरापर्यंत काम करून घरी परतत असताना या महिलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण असते. शहरात अनेक परकीय नागरिक वास्तव्यास आले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास येतात. बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची शासनातर्फे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.