Pune News : कोरोना काळात पुण्यातील पॅकिंगच्या कचर्‍याचे प्रमाण वाढले

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे अनेकांनी ऑनलाइन शॉपिंग आणि हॉटेलमधील पार्सल सेवेवर भर दिला. परिणामी या पार्सलसाठी वापरण्यात येणार्‍या ‘सिंगल यूज’ प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण कचरा संकलीत करणा-या स्वच्छ संस्थेने नोंदवले आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरिकांचे जगणे, वावरणे चार भिंतींच्या आत आले असले तरी प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण काही कमी झाले नाही. त्यातच प्लास्टिकवरील कारवाई थंडावल्याने किराणा सामानासाठी 50 मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. तसेच कोरोनामुळे शहरातून संकलीत होणार्‍या दररोजच्या कचर्‍यामध्ये चिप्स, शॅम्पूच्या पुड्या, घरातील कचरा टाकण्यासाठी प्लास्टिक बॅग, पार्सल सेवेतील प्लास्टिकची भांडी आणि पिशव्या, घरगुती कार्यक्रम वाढले, जेवणासाठी प्लास्टिकच्या प्लेट, ग्लास आदींचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनापूर्वी प्लास्टिक वापरासाठी दंड आकारण्यात येत होता. मात्र, कोरोनाकाळात ते प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये सुमारे 80 टक्के पुनर्वापर होण्याजोगा कचरा जमा झाल्याची माहिती स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.