Pune News : वर्षभरात मी पूर्णपणे कोथरूडकर झालोय – चंद्रकांत पाटील

एमपीसीन्यूज : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद माझ्याकडे असल्यामुळे मी सारखा फिरत असतो. परंतु कोथरूडकडे माझे सारखे लक्ष असते. गेल्या वर्षभरात प्रामुख्याने कोरोना काळात काम करताना मी कुठेही कमी पडलो नाही. या एक वर्षांमध्ये मी पूर्णपणे कोथरूडकर झालो असल्याचे कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

2014 च्या विधानसभा निवडणुकी आधी कोथरूड मतदार संघातून आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांचे तिकीट 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे कापण्यात आले व त्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिलं होतं. ते निवडूनही आले होते. यावेळी बाहेरून आलेले आमदार म्हणून चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले होते.

परंतु मागील एक वर्षांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना आमदार पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

मतदार संघात प्रत्यक्षात भेटी देऊन नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोरोना काळात मतदार संघातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करणे, आरोग्याच्या सुविधा मिळवुन देणे यासारख्या कामे केली..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III