Pune News : अमर मुलचंदानी यांच्या घरातून ईडीने जप्त केली तब्बल 3 कोटीहून अधिक संपत्ती

एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील (Pune News) सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात ईडीने 10 ठिकाणी शोध मोहीम राबवली. यावेळी त्यांच्या घरातून तब्बल 2.72 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 41 लाख रुपयांची रोकड, 4 हाय एंड कार, डिजिटल उपकरणे आणि विविध गुन्हे दाखले असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ईडीने दिली आहे. ही कारवाई 27 जानेवारी रोजी करण्यात आली. 

छापे टाकल्यानंतर मूलचंदानी यांनी तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे.

अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. पिंपरी मधील  मिस्ट्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचे वाटप केल्याचेआणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते.

Chinchwad Bye-Election : राजकीय पक्षांचे बॅनर, फलक तत्काळ काढा; अतिक्रमण निर्मूलन विभागाचे निर्देश

पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pune News) याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला होता. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यावधीचा पैसा अडकून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.