Pune News : केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडीची नोटीस येते : जयंत पाटील

एमपीसी न्यूज : दिल्लीतील केंद्रसरकारच्या विरोधात जे जे बोलत आहेत, त्यांना ईडीची नोटीस येते, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात केली.

पुणे लष्कर भागातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, जे कोणी केंद्र सरकारविरोधात बोलतील त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.अशा प्रकारे जाणीवपूर्वक त्रास देण्याचे भाजपचे धोरण आहे. तसेच ईडीच्या नोटीस पाठविणे, त्यातून संबंधितांना त्रस्त करणे आणि बदनाम करणे हे चुकीचे आहे.

आता हे सगळे देशाला कळायला लागले आहे. मात्र, या नोटीशीनंतर चौकशीअंती त्यातून काहीच सध्या होणार नाही, याचा मला विश्वास आहे.

खासदार संजय राऊत म्हणतात की वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे. राऊत बोलतात म्हणजे खरं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.