Pune News : मराठा आरक्षणात 12 टक्के जागांचा कोटा वाढवून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राबवावी : चंद्रकांतदादा पाटील

एमपीसी न्यूज : सध्या अकरावी, डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या 12 टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश प्रक्रिया राबवावी. पण सरकार कोणाशी चर्चा करत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

कोथरूड मतदारसंघातील नागरी सुविधांच्या अडचणी संदर्भात आज महापालिका आयुक्तांसोबत बैठक संपन्न झाली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. भाजपचे सरकार असते तर यातून तुम्ही कसा मार्ग काढला असता ? यावर बोलताना पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

पाटील म्हणाले, की सरकार मुळात कुठल्याच मुद्द्यावर सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत आम्ही यापूर्वीही शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करा, अशी सूचना केली आहे .

प्रवेश प्रकिया सुरू करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या 12 टक्के जागांचा कोटा वाढवून प्रवेश प्रक्रिया सुरू करता येऊ शकते, असे आमचे मत आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.